मुख्याध्यापकाचे शाळेच्या खोलीतच मद्यपान ! ; पालकांनी पकडले रंगेहाथ... पालक संतप्त

Share News

मुख्याध्यापकाचे शाळेच्या खोलीतच मद्यपान ! ; पालकांनी पकडले रंगेहाथ... पालक संतप्त

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : जिल्हा परिषद शाळांमध्ये इकडे विद्यार्थी पटसंख्या घटत असल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे शाळेमध्येच मुख्याध्यापक मद्यपान करत असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे पालकांनी या मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले आहे.  (The principal of the Zilla Parishad School in Khokalewadi, Parbhani district, was drinking alcohol in the school room! ; Parents caught him red-handed... Parents are angry)

परभणी जिल्ह्यातील खोकलेवाडी (ता.गंगाखेड) येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सकाळच्या सत्रात शाळेच्या खोलीतच मद्यपान करत होते. पालकांनी मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडल्याने सदर प्रकार उघडकीस आला. घटनेचे फोटो, व्हिडीओ शिक्षण विभागाला (Department of Education) सादर करत संतप्त पालकांनी मुख्याध्यापक बदलण्याची मागणी करुन शाळा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.

संतप्त पालकांनी दिला शाळा बंद ठेवण्याचा इशार :

गंगाखेड तालुक्यातील खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक शाळेतच दारु पित आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते शाळेत मुक्कामी राहत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पालकांकडे केली. काही पालकांनी सकाळच्या सत्रात अचानक शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एका खोलीत मद्यपान करताना आढळून आले. पालकांनी त्यांना रंगेहाथ पकडून जाब विचारला. झिंगाट मुख्याध्यापक उत्तर देऊ शकले नाही. पालकांनी रोष व्यक्त करत मुख्याध्यापकाला तात्काळ बदलण्याची मागणी केली आहे.

शाळेत भौतिक सुविधांचा वाणवा :

जिल्हा परिषद शाळेमध्ये वर्गखोल्यातील फळ्यांची व स्वच्छतागृहाची दयनिय अवस्था झालेली आहे. याबाबत पालकांनी मुख्याध्यापकाला जाब विचारला असता त्यांनी उत्तर दिले नाही. खोकलेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. सुशिला नामदेव मलगे यांनी शिक्षणाधिकार्‍यांकडे याबाबत लेखी तक्रार दिल्याचे समोर येत आहे.

ADS

Ad 1
Prev Article
शेतकऱ्यांना मोठा दिलासा....५५ कोटी रुपयाची पीकविमा भरपाई मिळणार
Next Article
३०० फूट खोल दरी...अतिवेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या टोकावर मधोमध अडकला तरूण...! ; पुढे वाचा आणि व्हायरल व्हिडीओ बघा...