Job opportunity in ST Corporation : एसटी महामंडळात नोकरीची संधी; रिक्त पदांसह कधी पर्यंत अर्ज करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

Share News

Job opportunity in ST Corporation : एसटी महामंडळात नोकरीची संधी; रिक्त पदांसह कधी पर्यंत अर्ज करायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

Share News

Maharashtra Headlines 24 : Job opportunity in ST Corporation : एसटी महामंडळाच्या बसचा प्रवास सुरक्षित प्रवास. त्यामुळे प्रवाशांचा ओढा महामंडळाच्या बस कडेच असतो. या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. नुकतेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध प्रशिक्षणार्थी पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (MSRTC Recruitment) ही भरती नाशिक विभागीय कार्यालयामार्फत जाहीर करण्यात आली. या भरतीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. (msrtc recruitment for trainee posts in maharashtra state road transport corporation)

उमेदवारांचे वय १४ ते ३० वर्षांच्या दरम्यान आवश्यक...

या भरती अंतर्गत एकूण ३६७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्यात अभियांत्रिकी पदवीधर, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनिंग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शिटमेटल वर्कर, वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रीक), पेन्टर, मॅकेनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर आणि कारपेंटर यांचा समावेश आहे. या पदांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ११ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांचे वय १४ ते ३० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

''या' वेबसाइटवर जाऊन नोंदणी करा :

सर्वप्रथम इच्छुक उमेदवारांनी www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढीलप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या निवडीसाठी अर्जाचा नमुना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयात (एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक) येथे उपलब्ध आहे. हा अर्ज नमुना भरून कार्यालयात सादर करायचा आहे.

ADS

Ad 1
Prev Article
fruit is the most nutritious : निरोगी राहण्यासाठी केळी, लिंबू की सफरचंद? सर्वात जास्त पौष्टिक फळ कोणते? वाचा सविस्तर
Next Article
Numerology : 'या' जन्मतारखेच्या लोकांना कर्मांचं फळ भोगावंच लागतं, यातून सुटका नसते, अंकशास्त्रात म्हटलंय...जाणून घ्या सविस्तर..