Soybean Market : 'या' बाजार समितीत मिळतोय सोयाबीनला तब्बल मिळताेय प्रतिक्विंटला ऐवढा भाव...

Share News

Soybean Market : 'या' बाजार समितीत मिळतोय सोयाबीनला तब्बल मिळताेय प्रतिक्विंटला ऐवढा भाव...

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : Soybean Market : सोयाबीन, कापूस व तूर ही तिन्ही पिके नगदी पिके म्हणून ओळखली जातात. मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांचा भर सोयाबीन, कापसावरच असतो. मागील काही दिवसांपासून सोयाबीनला चांगला दर मिळेल या आशेवर होते. मात्र मागील हंगामात शेवटपर्यंत शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नाही.  (Soybean is getting a price of Rs 4,700 per quintal in the market committee.)

दरम्यान, खरीप हंगामातील सोयाबीन अजून शेतातच असून त्याला किमान दोन महिने लागतील बाजारात येण्यासाठी. मात्र, त्याआधीच जुन्या सोयाबीनच्या (Soybean Market) दरात हळूहळू सुधारणा होताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये गुरुवारी (३१ जुलै) रोजी सोयाबीनचे दर तब्बल ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. 

(Soybean Market) सोयाबीन दरात सुधारणा :

यंदा रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अतिशय कमी दरांना सामोरे जावे लागले होते. मार्च ते मे महिन्यात दर ४ हजार रुपयांच्या खाली घसरले होते, त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नव्हता. अनेक शेतकऱ्यांनी दर वाढेल या आशेने साठवणूक केली होती. आता या साठवलेल्या सोयाबीनला चांगला दर मिळताना दिसतोय.विशेष म्हणजे, वाशिम बाजार समितीत बुधवारी ४ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटलचा कमाल दर नोंदविण्यात आला होता.

दरवाढीमागील प्रमुख कारणं 

  • जागतिक स्तरावर मागणी वाढ झाली. खाद्यतेल व प्रोटीनचा मोठा वापर.
  • अमेरिकेतील साठा घटण्याची शक्यता असल्याने जागतिक बाजारावर परिणाम.
  • निर्यातीतील मर्यादा काही देशांनी निर्यात थांबवली.
  • भारत सरकारकडून आयात धोरणातील बदल नाहीत. स्वदेशी उत्पादनावर परिणाम.

हंगाम सुरू होताच मोठी घसरण : 

शेतकरी सध्या विक्रीपासून थांबलेले दरवाढ होत असली तरी सध्या खरीप हंगामात तणनियंत्रण, कीडनियंत्रण व आंतरमशागत यामुळे शेतकरी बाजारात येणं कमी झाले आहे. अधिक दरांची अपेक्षा असल्यामुळेही शेतकरी सोयाबीन विक्री टाळत आहेत. त्यामुळे आवक कमी आणि मागणी वाढल्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. हंगामात झालेली निराशा अजूनही आठवते. हंगामाआधी दर ४ हजार ७०० रुपये होते, पण हंगाम सुरू होताच मोठी घसरण झाली. मार्च-मेमध्ये ४ हजार रुपयांच्या खाली दर गेले. खर्चही निघत नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला होता. 

दरवाढ कायम राहील की पुन्हा घसरेल? 

सध्या शेतकऱ्यांनी साठवलेले जुने सोयाबीन चांगल्या दरात विकले जात आहे. पुढील काही आठवड्यांत आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, आयात-निर्यात धोरण आणि देशांतर्गत उत्पादन आढळल्यावरच दरवाढीची दिशा स्पष्ट होईल. दरवाढ कायम राहील की पुन्हा घसरेल याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ADS

Ad 1
Prev Article
Incident in Nanded : धक्कादायक...मुक्कामी आलेल्या शिक्षकाचा लॉजमध्ये आढळला मृतदेह‌; नांदेड जिल्ह्यातील घटना; वाचा सविस्तर
Next Article
fruit is the most nutritious : निरोगी राहण्यासाठी केळी, लिंबू की सफरचंद? सर्वात जास्त पौष्टिक फळ कोणते? वाचा सविस्तर