Incident in Nanded : धक्कादायक...मुक्कामी आलेल्या शिक्षकाचा लॉजमध्ये आढळला मृतदेह‌; नांदेड जिल्ह्यातील घटना; वाचा सविस्तर

Share News

Incident in Nanded : धक्कादायक...मुक्कामी आलेल्या शिक्षकाचा लॉजमध्ये आढळला मृतदेह‌; नांदेड जिल्ह्यातील घटना; वाचा सविस्तर

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : Incident in Nanded : नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात एका खाजगी संस्थेवर कार्यरत असलेल्या शिक्षकाचा लॉजमध्ये मृतदेह आढळून आला. अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव पाटीजवळ हॉटेल स्वराज्य लॉजमध्ये शनिवारी सकाळी ही घटना उघडलीस आली. आशिष भाऊसाहेब शिंदे (रा. गुंटूर ता. कंधार) मृत शिक्षकाचे नाव आहे. या घटनेनंतर विविध चर्चाना उधाण आले होते.  (Teacher's body found in lodge; Incident in Nanded district)

वेटरने रूमचा दरवाजा खटखटावला... 

अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव परिसरात हॉटेल स्वराज फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉज आहे. आशिष भाऊसाहेब शिंदे हे शिक्षक मुक्कामास होते. शनिवारी सकाळी शिंदे आपल्या रूममध्ये अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. सकाळ पासून आशिष हे रूमच्या बाहेर न आल्याने संशय आला. वेटरने रूमचा दरवाजा खटखटावला, आवाज देखील लगावला, पण आतून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा रूमला दरवाजा तोडण्यात आला. 

दरवाजा तोडताच मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत :

दरवाजा तोडताच आशिष शिंदे यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हॉटेलच्या व्यवस्थापनाने तात्काळ अर्धापूर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम,जमादार भिमराव राठोड, राजेश गुट्टलवाड,अरूण पाटील हे घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शिक्षक आशिष‌ शिंदे यांना रुग्णवाहिकेने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता यावेळी डॉक्टरांनी शिंदे यांना मृत घोषित केले.

आशिष एका खाजगी संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत :

 आशिष भाऊसाहेब शिंदे हे खाजगी संस्थेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. १ ऑगस्ट शुक्रवारी रोजी रात्री लॉजमध्ये मुक्कामी होते. शवविच्छेदन शासकीय रूग्नालयात करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी अर्धापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृत्यूचे कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.

ADS

Ad 1
Prev Article
उत्तर भारतात गुजरात स्पर्धेत असतानाही खान्देशातील केळीचा दबदबा कायम ; उत्पादकांनाही दिलासा, किती मिळतोय भाव?; वाचा सविस्तर...
Next Article
Soybean Market : 'या' बाजार समितीत मिळतोय सोयाबीनला तब्बल मिळताेय प्रतिक्विंटला ऐवढा भाव...