महाराष्ट्र हेडलाईन्स : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस धो धो बरसत असला तरी मराठवाड्यात मात्र रुसला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पीकही आता धोक्यात आली आहे. तसेच प्रकल्पातील पाणीसाठाही घटत चालला (The water storage in the project is also decreasing ) असून तहानलेली आहेत. त्यामुळे बळीराजाचे डोळे आता पुन्हा एकदा आकाशाकडे लागलेले आहेत. दरम्यान हवामान विभागाने यावर्षी व्यक्त केलेला पावसाचा अंदाज फोल ठरला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे.
पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता :
२४ ते ३१ जुलैदरम्यान मध्य भारतासह महाराष्ट्राच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला (The Meteorological Department has predicted rain.) आहे. विशेष म्हणजे ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
पावसा अभावी पिकांनी माना टाकल्या :
सध्या पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानातही वाढ झाली आहे. प्रचंड उकाडा वाढला आहे. नागरिक घामाघुम होत आहेत. त्यातच शेती पिकांनी ही माना टाकल्या आहेत. ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी तुषार सिंचनामार्फत पिकाला पाणी देत आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळे पिकाची वाढ खुंटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत पावसाची नितांत आवश्यकता आहे. आतापर्यंत राज्याच्या काही भागातच समाधानकारक पाऊस झाला आहे. उर्वरित भागाला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे हवामान विभागाचा हा अंदाज शेतकऱ्यांना दिलासादायक ठरणारा आहे.
हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता :
राज्याच्या बहुतांश भागात सोमवारपर्यंत पावसाचा फारसा जोर नसेल. अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी बरसतील. मात्र सोमवारनंतर राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तर उर्वरित भागात हलक्या सरींची शक्यता आहे.
२५ जुलैपर्यंत मराठवाडा, आणि विदर्भात पाऊस :
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार (According to the forecast by the Indian Meteorological Department) ३१ जुलै ते ७ ऑगस्ट या काळात मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. विशेषतः पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नांदेड, लातूर, बीड आणि परभणी या भागात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. आजपासून (१९ जुलै) ते २५ जुलैपर्यंत मराठवाडा, आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर :
रविवार (२० जुलै), सोमवार आणि मंगळवारी मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची जोर अधिक राहील. मंगळवार आणि बुधवारी विदर्भातील काही जिल्ह्यांत तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
३१ जुलै ते ७ ऑगस्ट या जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस :
३१ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, नंदूरबार आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.