आपल्या स्वयंपाकघरातील 'या' वस्तूंचा वापरून करून सर्दी-खोकल्याच्या त्रासाला मुळापासून करा नष्ट...

Share News

आपल्या स्वयंपाकघरातील 'या' वस्तूंचा वापरून करून सर्दी-खोकल्याच्या त्रासाला मुळापासून करा नष्ट...

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : आता पावसाळा सुरू झाला आहे. ऋतू बदलताच मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. या काळात सर्दी-खोकल्यासारखे त्रास (Cold and cough-like problems) सुरू होतात. परंतु, घाबरून जाण्याची गरज नाही. औषधं घेण्याआधी काही घरगुती उपाय वापरले, तर लवकर आराम मिळू शकतो. या औंषधी वनस्पती आपल्या स्वयंपाकघरात (In the kitchen) मिळून येतात. मात्र, आपण त्याकडे गांभीर्याने पहात नाहीत. कोणत्या गोष्टी आपल्या आरोग्यासाठी उपयोगी येतात, हे पाहता येईल. 

गळ्याला खवखव, नाक वाहणं, शिंका... 

पावसाच्या सिझनमध्ये हवामानातली थंडी, आर्द्रता आणि बदलती हवा आपल्या शरीरावर थेट परिणाम करत असते. विशेषतः मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यात या काळात सर्दी, खोकला आणि अंग दुखी यासारख्या समस्या सामान्य होतात. पावसात भिजलेली रस्ते, गार वारे आणि दमट वातावरण आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करतं आणि परिणामी गळ्याला खवखव, नाक वाहणं, शिंका येणं आणि खोकल्याचा त्रास सुरू होतो.

सर्दी-खोकल्याच्या त्रासाला मुळापासून नष्ट :

या समस्येवर डॉक्टर सांगतात की, सुरुवातीच्या टप्प्यातच घरगुती उपाय वापरल्यास वेळीच आराम मिळतो आणि शरीरावर कुठलाही साइड इफेक्ट होत नाही. आयुर्वेद आणि पारंपरिक नुस्ख्यांमध्ये अशी ताकद आहे की ते पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी-खोकल्याच्या त्रासाला मुळापासून नष्ट करू शकतात.

अदरक आणि मध : अदरकात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, तर मध गळ्याला आराम देतो. एक चमचा ताजं अदरकाचं रस काढून त्यात एक चमचा शुद्ध मध मिसळा आणि हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्या. यासोबत दिवसभर गुनगुना पाणी प्यावं आणि थंड पाण्याचे सेवन टाळावं. यामुळे खोकल्यावर आराम मिळतो आणि झोपही चांगली लागते.

वाफ घ्या : सर्दीमुळे नाक बंद होणं आणि छातीत जडपणा येणं पावसात नेहमीच होतं. यावर वाफ घेणं हा एक उत्तम आणि सहज उपाय आहे. गरम पाण्यात पुदिन्याची 5-6 पानं किंवा थोडंसं विक्स टाका. नंतर डोकं आणि तोंड टॉवेलने झाकून 7 मिनिटं वाफ घ्या. दिवसातून दोन वेळा हा उपाय केल्यास फुफ्फुसं साफ होतात, श्वसन मार्ग मोकळा होतो आणि सर्दी-खोकल्यात झपाट्याने आराम मिळतो.

 तुळस-काळी मिरीचं काढा : तुळस नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर आहे आणि काळी मिरी इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते. एका कप पाण्यात 5 तुळसीची पानं, 3 काळी मिरी आणि थोडं अदरक टाकून 5 मिनिटं उकळा. नंतर गाळून कोमट प्या. चव वाढवण्यासाठी थोडे मध घालू शकता. हा काढा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो आणि शरीरात उष्णता निर्माण करून सर्दी-खोकल्यावर प्रभावीपणे काम करतो.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. 'महाराष्ट्र हेडलाईन्स' याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

ADS

Ad 1
Prev Article
एम्प्लॉयमेंट न्यूज : महिला व बालविकास विभागात मेगा भरती...! अर्ज भरण्यास सुरुवात
Next Article
सकाळी उपाशीपोटी लिंबू पाणी पिल्याने होतात मोठे फायदे! ; जाणून घ्या कोणते ते?