महाराष्ट्र हेडलाईन्स : महत्वाची बाब म्हणजे भारतीय रेल्वेकडून सातत्याने रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढवण्यावर जोर दिला जात आहे आणि अनुषंगाने नवनवीन रेल्वे मार्ग सुद्धा विकसित केले जात आहेत. तसेच नवनवीन स्थानक सुद्धा विकसित केले जात आहे. (India's deepest railway station to be built in 'this' city in Maharashtra..!; Bullet train will run at 320 kilometers per hour)
जमिनीपासून 100 फूट खाली असणार नवीन स्थानक :
दरम्यान, महाराष्ट्रात (Maharashtra) असंच एक नवीन आणि अगदीच अद्भुत असे रेल्वे स्टेशन (Railway Station) तयार होणार आहे. आपल्या महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक खोल रेल्वे स्थानक विकसित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या स्थानकाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने याची खोली ही ३२ मीटर म्हणजे जवळपास १०० फूट इतकी असल्याची माहिती दिली आहे. कॉर्पोरेशन कडून या स्थानकाच्या कामाचा एक व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे.
भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. खरे तर देशातील (indian) रेल्वेचे नेटवर्क हे फारच विस्तृत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे पोहोचलेली आहे आणि यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात पोहोचली आहे. देशातील रेल्वे नेटवर्क बाबत बोलायचे झाले तर हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे, आपल्या देशात साडेसात हजाराहून अधिक रेल्वे स्थानक आहेत.
कस असणार भारतातील सर्वात खोल रेल्वे स्थानक?
भारतातील सर्वात खोल रेल्वे स्थानक आपल्या मुंबईत विकसित होणार आहे आणि ही नक्कीच एक आनंदाची बाब आहे. याच बीकेसी येथे तयार होणाऱ्या नव्या बुलेट ट्रेन स्टेशन बाबत बोलायचं झालं तर प्लॅटफॉर्म, कॉन्कोर्स आणि सर्व्हिस फ्लोअर असे तीन मजले असणार आहेत.
ताशी ३२० किलोमीटरने बुलेट ट्रेन bullet train धावणार..
या स्टेशनवर एकूण सहा प्लॅटफॉर्म राहणार आहेत. या प्लॅटफॉर्मची लांबी अंदाजे ४१५ मीटर इतकी असेल. दरम्यान, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प सुरू झाल्यानंतर या मार्गावर ताशी ३२० किलोमीटरने बुलेट ट्रेन धावणार असून यामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास अवघ्या तीन तासांवर येणार आहे.