महाराष्ट्र हेडलाईन्स : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला, सातारा जिल्ह्यात सुद्धा यंदा पावसाने फार कहर केला आहे. त्यामुळे राज्यातील काही झेडपीच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या शाळांना तब्बल दीड महिना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका सुद्धा झाला निर्माण :
विशेषतः जिल्ह्यातील पश्चिम भागातील पाटण, महाबळेश्वर आणि जावली तालुक्यांत पावसाचे अगदीच रौद्ररूप पाहायला मिळत आहे. या तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे, यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथील डोंगराळ भागांमध्ये होणाऱ्या मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे. दरम्यान, याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील काही भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
१३ ऑगस्ट २०२५ पर्यंत पावसाळी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय :
जिल्हा परिषद प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर आणि जावळी या तीन तालुक्यांतील जवळपास ३३४ झेडपीच्या म्हणजेच प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. या संबंधित शाळांना एक जुलै २०२५ पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून १२ ऑगस्टपर्यंत या शाळा आता बंद राहणार आहे. म्हणजेच दीड महिना या शाळा बंद राहतील. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील १८६ , महाबळेश्वरमधील ११८ आणि जावळी तालुक्यातील ३० प्राथमिक शाळांना १३ ऑगस्ट २०२५ पर्यंत पावसाळी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
या भागातील शाळा दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बंद असतात. दरवर्षी येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पावसाळी सुट्टी दिली जाते आणि यंदाही या विद्यार्थ्यांना पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येथील शाळा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बंद असतात म्हणून या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या दिल्या जात नाहीत.
शाळांना सुट्टी जाहीर :
जिल्हा परिषद प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर आणि जावळी या तीन तालुक्यांतील जवळपास ३३४ झेडपीच्या म्हणजेच प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. या संबंधित शाळांना एक जुलै २०२५ पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून १२ ऑगस्टपर्यंत या शाळा आता बंद राहणार आहे.
मराठवाड्यात मोठ्या पावसाची प्रतिक्षा :
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मे मध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर पावसाळ्याचा सव्वा महिना उलटला तरी, मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. प्रकल्पात म्हणावा तसा जलसाठा झाला. नाही. नांदेडकरांची तहान भागविणा-या विष्णूपुरी प्रकल्प, शेजारील हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वरधरण, परभणी जिल्ह्यातील येलदरी, यवतमाळ जिल्ह्यातील ईस्लापूर धरणात ५० टक्केच्या खाली जलसाठा आहे. त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे.