जर्मन ऑलिम्पियाड परीक्षेत देवयानी बढे महाराष्ट्र अव्वल...

Share News

जर्मन ऑलिम्पियाड परीक्षेत देवयानी बढे महाराष्ट्र अव्वल...

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : धोंडेवाडी (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील देवयानी बढे हिने सातवीत दिलेल्या जर्मन ऑलिम्पियाड (ए वन) परीक्षेत ५० पैकी ५० गुण मिळवत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

जर्मन आणि फ्रेंच भाषेच्या फ्लोरा संस्थेकडून १ जूनला घेतलेल्या ऑनलाइन परिक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण १४०० विद्यार्थ्यांमधील शाळेतील पाचवी ते सातवीतील सात विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मंगळवारी (ता. ८) लागलेल्या निकालात देवयानीने प्रथम क्रमांक पटकावून धोंडेवाडीचे नाव उज्ज्वल केले. तसेच, स्वरा धोंडे, साई शिरगावकर, जानवी धोंडे, सुधीर धोंडे, श्रेया शिरगावकर, आरव सस्ते हे विद्यार्थीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यांना मुख्याध्यापक जयवंत जाधव, तनपुरे, अनिता पवार यांचे मार्गदर्शन लाभले. भोरचे गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, केंद्रप्रमुख अंजना वाडकर, विस्ताराधिकारी सुषमा पाटील, ग्रामपंचायत सदस्य सोपान धनावडे, विठ्ठल धोंडे, सीमा शिरगावकर, ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर, रघुनाथ पारठे, दत्तात्रेय सुतार, संकेत धनावडे, अंकुश भिलारे, सोपान धोंडे, स्नेहल देशमाने, कमल धनावडे, आशा शिरगावकर यांनी देवयानीचे कौतुक करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. 

अनाथ देवयानी हिचे यश कौतुकास्पद :

लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपलेली म्हाकोशी (ता. भोर) येथील देवयानी ही पहिलीपासून धोंडेवाडी येथील तिची आत्या सरूबाई धोंडे यांच्याकडे राहून शिक्षण घेत आहे. देवयानी लहानपणापासूनच हुशार असून तिला शासकीय सेवेत अधिकारी करण्याचे स्वप्न असल्याचे धोंडे कुटुंबाने सांगितले.तिने नुकताच रावडी विद्यालयात आठवीत प्रवेश घेतला आहे. देवयानीच्या हुशारीमुळे गावात ती सर्वांची लाडकी असून या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. देवयानीला बहिण-भाऊ असून ते माजगाव (ता. भोर) येथे मामाकडे राहत आहेत.

ADS

Ad 1
Prev Article
भारतातील सर्वाधिक खोल रेल्वे स्टेशन महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार..!; ताशी ३२० किलोमीटरने बुलेट ट्रेन धावणार
Next Article