महाराष्ट्र हेडलाईन्स : आज प्रत्येक जण नोकरीच्या शोधात आहे. बरेच जण स्थलांतर करत आहे. चांगली नोकरी, जास्तीचे पैसे मिळावेत प्रत्येकालाच वाटते. त्यामुळे या संधीचा शोध घेतला जातो. दरम्यान, या संधीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र अंतर्गत राज्य बाल हक्क संरक्षण आयोग (State Commission for Protection of Child Rights) येथे काही पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. संबंधित विभागाने अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली असून इच्छुकांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
असा आहे पदांचा तपशील व पात्रता :
अध्यक्ष पदासाठी पात्रता :
शैक्षणिक पात्रता : किमान पदवीधर
अनुभव: बालकल्याण व विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेली व प्रतिष्ठित व्यक्ती असावी
नोंद: अशा व्यक्तीला दोन वेळा या पदावर नियुक्त केले गेले असल्यास, ती पुन्हा या पदासाठी पात्र ठरणार नाही.
सदस्य पदासाठी पात्रता :
शैक्षणिक पात्रता: किमान पदवीधर
एकूण सदस्य पदे : 06 (यामध्ये किमान 2 महिला असाव्यात)
इतर महत्त्वाचे तपशील:
अर्जाची पद्धत: पूर्णपणे ऑफलाइन. अर्ज पोस्टाने/प्रत्यक्ष पाठवावा लागेल.
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
आयुक्त कार्यालय, महिला व बाल विकास आयुक्तालय,
28 – राणीची बाग, जुनं सर्किट हाऊसजवळ,
महाराष्ट्र राज्य, पुणे – 411001.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत म्हणजेच 31 जुलै 2025 पर्यंत अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
वेतनश्रेणी: पदाच्या स्वरूपानुसार ठरवण्यात येईल (जाहिरात पाहावी)
या प्रश्नांची वारंवार विचारणा होते...
Q1 महिला व बालविकास विभाग भरतीसाठी पात्रता काय आहे?
किमान पदवीधर असणे आवश्यक आहे आणि अध्यक्ष पदासाठी बालकल्याण क्षेत्रात अनुभव असावा.
Q2 एकूण किती पदे आहेत?
एकूण 7 पदे असून त्यात 1 अध्यक्ष आणि 6 सदस्य पदांचा समावेश आहे.
Q3 अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 आहे.
Q4 अर्ज कसा करायचा आहे?
ही भरती ऑफलाइन पद्धतीने असून अर्ज पोस्टाने पाठवावा लागेल.
Q5 निवड झाल्यावर कामाचे ठिकाण कुठे असेल?
निवड झाल्यानंतर उमेदवारांचे कामाचे ठिकाण पुणे येथे असेल.