तुम्ही रेल्वेने प्रवास करता? मग, नव्या बदलात आता किती दिवस आधी बुकिंग करता येईल? हे जाणून घ्या...

Share News

तुम्ही रेल्वेने प्रवास करता? मग, नव्या बदलात आता किती दिवस आधी बुकिंग करता येईल? हे जाणून घ्या...

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : रेल्वेचा प्रवास हा अतिशय सुखद आहे. त्यामुळे बहुतांश जण रेल्वेच्या प्रवासालाच जास्त प्राधान्य देतात. रेल्वेतील प्रवासाचा आनंद ही वेगळाच आहे. रेल्वेचे खिडकीत बसून पळणारी झाडे पाहण्यात बच्चे कंपनींना जास्त आवडतात. रेल्वेतील हा प्रवास कायम स्मरणात राहणारा असतो. दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या ही आता वाढत आहे. प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. प्रवासात एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिकीट आरक्षण. अनेकांना अजूनही हा प्रश्न सतावत असतो की रेल्वेचं तिकीट नेमकं किती दिवस आधी बुक करता येतं? कधी योजना आखावी आणि कधी बुकिंग विंडो उघडते याची योग्य माहिती नसल्याने बऱ्याच वेळा प्रवासाच्या शेवटच्या क्षणी गोंधळ उडतो. रेल्वेने नियम बदलेले (Railway Rules For Ticket Booking) आहेत. 

काय आहे बदल? :

काही वर्षांपूर्वीपर्यंत रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तिकीट बुकिंगसाठी तब्बल 120 दिवस म्हणजेच जवळपास 4 महिने आधी तयारी करावी लागत असे. ही पद्धत खूप काळ लागू होती आणि अनेक जण त्याप्रमाणेच आपला प्रवास ठरवायचे. मात्र 1 नोव्हेंबर 2024 पासून रेल्वेने यात महत्त्वाचा बदल केला. रेल्वेने आगाऊ आरक्षणासाठी असलेला कालावधी आता निम्म्यावर आणला आहे. सध्या भारतीय रेल्वेने ठरवलेला आगाऊ आरक्षण कालावधी म्हणजे 60 दिवस. 

प्लॅन ठरला की बुकिंग... 

म्हणजे जर एखाद्याला 1 डिसेंबरला प्रवास करायचा असेल, तर तो आपले तिकीट 1 ऑक्टोबरपासून कधीही बुक करू शकतो. हे नियम मेल, एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि आरक्षित गाड्यांसाठी लागू आहेत. या 60 दिवसांच्या विंडोमध्ये तिकीट मिळवण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे प्लॅन ठरला की बुकिंग उशीर न करता करणे योग्य राहिलं. 

शेवटच्या क्षणीसुद्धा प्रवास शक्य... 

एसी क्लाससाठी ही बुकिंग सेवा प्रवासाच्या आदल्या दिवशी सकाळी 10 वाजता सुरू होते, तर नॉन एसीसाठी 11 वाजता. त्यामुळे शेवटच्या क्षणीसुद्धा प्रवास शक्य होतो.

तसेच, जर तुम्ही जनरल किंवा अनारक्षित डब्यातून प्रवास करणार असाल, तर त्यासाठीचं तिकीट प्रवासाच्या दिवशी स्टेशनवरूनच मिळते. म्हणजेच त्या दिवशी सकाळी तुम्ही स्टेशनवर जाऊन तिकीट खरेदी करू शकता.

ADS

Ad 1
Prev Article
वारं पठ्या... दोन्ही हात गमावल्यानंतरही महसूल सहायकपदाला गवसणी; वैभवची ज‍िद्द आणि हिंमतीला दाद..
Next Article
एम्प्लॉयमेंट न्यूज : महिला व बालविकास विभागात मेगा भरती...! अर्ज भरण्यास सुरुवात