विदर्भाची बातमी : स्मार्ट मीटर वापरल्याने देयक दुप्पट..! ; ग्राहकांमध्ये तीव्र संताप

Share News

विदर्भाची बातमी : स्मार्ट मीटर वापरल्याने देयक दुप्पट..! ; ग्राहकांमध्ये तीव्र संताप

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : टीओडी (टाईम ऑफ डे) हे वीज मीटर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यावर ॲटोमॅटिक मीटर रिडिंग (एएमआर) ची सोय आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात ही प्रणाली कार्यान्वित करण्यात येत आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी या मीटरला विरोध होत आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून नागपुरात स्मार्ट मीटरविरोधात नुकतेच आंदोलन झाले होते. यावेळी समितीने नागपूर जिल्ह्यातील स्मार्ट मीटर लागलेल्या एक हजार घराचे सर्व्हेक्षण करत त्यांचे देयक दुप्पट आल्याचा दावा केला होता. परंतु ग्राहक न्याय परिषद महाराष्ट्रतर्फे (नागपूर जिल्हा) महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Chief Minister Devendra Fadnavis) आश्वासनांची आठवण करून दिली. (Vidarbha news: Payments doubled due to using smart meters..!; Consumers are furious)

काय म्हटले निवेदना? :

ग्राहक न्याय परिषद महाराष्ट्रतर्फे (नागपूर जिल्हा) महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप डोडके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिष्टमंडळात परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. बिप्लब मजूमदार, कार्यकारी अध्यक्ष आनंद लुटडे, अखिल पवार, रीना राऊत, अभय राऊत आदी उपस्थित होते. स्मार्ट मीटरबाबत नागरिकांत अनेक गैरसमज आहे. त्यात हे मीटर जबरदस्तीने लावले जात आहे, हे प्रीपेड मीटर आहे, त्यातून जास्त देयक येते, बिघाड झाल्यास दुरुस्ती होणार नाहीसह इतर. या सर्व गैरसमजांचे खंडन करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत या मीटरबाबत स्पष्टता दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितले? : 

मीटरच्या स्पष्टतेनुसार, स्मार्ट मीटर आता पोस्टपेड असतील. आतापर्यंत २७ हजार ८२६ फीडर मीटर आणि ३७ लाख ग्राहकांकडे मीटर लावले गेले. या मीटरवर सोलर अवर्स (सकाळी ९ ते संध्याकाळी ५) दरम्यान वीज वापरावर १० टक्के सवलत मिळेल. आजपर्यंत सुमारे ४० लाख मीटर्स लागले असून त्यापैकी केवळ १ टक्के तक्रारी मिळाल्या आहे. त्याही तातडीने निकाली काढल्या गेल्या. एकाही ग्राहकाला अनावश्यक किंवा जास्त देयक गेले नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सांगितले. दरम्यान शिष्टमंडळाला महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी महत्वाचे आश्वास दिले.

महावितरणचे मुख्य अभियंता काय म्हणाले ? :

शिष्टमंडळाला महावितरणचे नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके म्हणाले, नागपूर मंडळात स्मार्ट मीटर पूर्णतः मोफत बसवले जात आहे. हे मीटर पोस्टपेड पद्धतीचे असून ग्राहकांना कोणताही आर्थिक भार नाही. १० वर्षांपर्यंत मोफत देखभाल व बदलाची हमी संबंधित सेवा कंपनीकडून दिली जात आहे. हे मीटर लागल्यावर ग्राहकांना मोबाईल अ‍ॅपवरून वीज वापराची माहिती एका क्लिकवर पाहता येते. त्यातून वीज वापराचे वेळीच नियोजन करणे शक्य आहे. दोडके यांच्या माहितीनंतर ग्राहक न्याय परिषदने महावितरणकडे मागणी केली की, या मीटरबाबत शासकीय घोषणांची आणि वस्तुनिष्ठ माहितीची जनजागृती मोहीम सर्वत्र राबवावी. जेणेकरून समाजातील गैरसमज दूर होतील आणि ग्राहक विश्वासाने स्मार्ट मीटर स्वीकारतील.

नांदेड परिमंडलात ७८८९० मीटर बसवले :

नांदेड परिमंडलात कृषी ग्राहक वगळता इतर सर्व वर्गवारीतील लघुदाब व उच्चदाब श्रेणीतील ७८८९० ग्राहकांना टीओडी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात ४९८९५, परभणी जिल्ह्यात १३८६९ तर हिंगोली जिल्ह्यात १५१२६ ग्राहकांच्या दारावर टीओडी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत.

वेळेनुसार विजेच्या वापराची ठेवते नोंद :

महावितरणच्या नवीन वीजदर प्रस्तावानुसार, ग्राहकांने कोणत्या वेळेत वीज वापरली त्यानुसार वीज दरात सवलत देण्याची तरतूद आहे. सायंकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंतचा वेळ उच्चांकी वीज मागणीचा काळ असतो. त्या वेळातील विजेचे दर इतर साधारण वेळेच्या (सौर कालावधी- सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत) तुलनेने अधिकचे असतात. सर्वसाधारण अर्थात कमी वीज मागणी कालावधीत वीज वापरल्यास त्याचा फायदा घेण्यासाठी ग्राहकाकडे टीओडी स्मार्ट मीटर वापरणे आवश्यक आहे. कारण टीओडी स्मार्ट मीटरच वेळेनुसार विजेच्या वापराची नोंद ठेवते.

ADS

Ad 1
Prev Article
Nitin Gadkari house in Nagpur : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील घराला बॉम्बने उडवण्याची धमकी ; वाचा सविस्तर
Next Article
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खूष खबर..! दोन महिन्यांचा हफ्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार...