महाराष्ट्र हेडलाईन्स : Ladki Bahin Yojana : राज्यात एकीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी घेतल्याने गदारोळ सुरू आहे. त्यात जुलै महिना संपला तरी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हफ्ता जमा झालेला नव्हता. त्यामुळे जुलैचा हफ्ता येणार की नाही? अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली असतानाच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची (raksha bandhan 2025) भेट मिळणार आहे. जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माहिती दिली आहे. (Good news for dear sisters..! Two months' salary will be deposited in the account on 'this' day)
आत्मनिर्भर बनविण्यासाठी योजना :
महिला व मुलींना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.
२१ वर्षांपुढील मुलगी, महिलेस योजनेचा लाभ देण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करण्यात आल्याने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज बांधत अनेक महिलांनी लाभासाठी प्रस्ताव दाखल केले. त्यानंतर अर्जाची छाननी करून पात्र प्रस्तावांना झाल्याने मंजुरी देण्यात आली.
नोंदणीसाठी पोर्टल बंद :
दरम्यान, निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने ऑनलाइन नोंदणीसाठी पोर्टल बंद करण्यात आले असून अद्याप हे पोर्टल सुरू झाले नाही. याशिवाय काही लाडक्या बहिणींच्या जून महिन्याचा हप्ता मिळाला नसल्याने असंतोष व्यक्त केला जात होता.
रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सन्मान निधी :
दरम्यान, आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याची माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस जुलै महिन्याचा सन्मान निधी (१५०० रुपये) वितरित करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल."
अपात्र महिलांचा लाभ बंद :
लाडकी बहिण या योजनेच्या पडताळणीमध्ये लाखों महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. आता या महिलांना लाडकी बहिण योजनेचा यापुढे कधीच लाभ घेता येणार नाही. या महिलांनी निकष पूर्ण न केल्यामुळे हे अर्ज बाद केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.