Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक व्यवसायात कमावतात भक्कम पैसाच पैसा...

Share News

Numerology : 'या' जन्मतारखेचे लोक व्यवसायात कमावतात भक्कम पैसाच पैसा...

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : Numerology Of Mulank 6 ज्योतिष शास्त्र हा एक प्राचीन भारतीय विद्या आहे ज्यात ग्रह, नक्षत्र, राशी यांचा अभ्यास करून व्यक्तीचे भविष्य, स्वभाव, आरोग्य, आर्थिक स्थिती, विवाह, संतती, नोकरी, व्यवसाय इत्यादी बाबींचा अंदाज घेतला जातो. हा वेदाचा सहा उपवेदांपैकी एक आहे (अर्थात वेदाङ्ग). याला नेत्र (डोळे) असेही म्हटले जाते कारण हे भविष्याचा वेध घेते. ज्योतिषशास्त्रामध्ये राशींना खूप महत्त्व आहे तसेच अंकशास्त्रामध्ये (Ank Shastra) अंकाना खूप महत्त्व असते. व्यक्तिच्या जन्मतारखेवरून आपण व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊ शकतो. हल्ली अनेक जण अंकशास्त्रामध्ये आवड दाखवत आहे, ज्यामध्ये ते एकमेकांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जाणून घेऊ शकतात. तसेच अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही कोणत्याही व्यक्तीच्या हावभावाविषयी जाणून घेऊ शकता. तसेच या द्वारे तुम्ही स्वत:च्या किंवा इतरांबरोबर घडणाऱ्या घटनांविषयी जाणून घेऊन सतर्क राहू शकता.

 अंकशास्त्रात 1 ते 9 मूलांकाचं वर्णन करण्यात आलं आहे. या मूलांकावरुनच व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या सवयी आणि व्यक्तीच्या भविष्याबाबत अंदाज वर्तवला जातो. या ठिकाणी आपण (Mulank) मूलांक 6 च्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

कसा असतो स्वभाव?

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 6,15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 चा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रह हा धनसंपत्ती, वैभव आणि भौतिक सुख शांतीचा कारक ग्रह मानला जातो. या मूलांकात जन्मलेल्या लोकांकडे पैशांची कमतरता नसते. या जन्मतारखेच्या लोकांना ऐशोआरामात जगायला आवडतं. तसेच, मोठमोठ्या कंपन्यांचे हे मालक असतात. मूलांक 6 ची आणखी कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात. 

स्मार्ट आणि आकर्षक व्यक्तिमत्व :

या जन्मतारखेचे लोक राजेशाही थाटात जगणं पसंत करतात. त्याचबरोबर हे लोक वर्तमानात जगतात. पैशांच्या बाबतीत अजिबात कंजूष नसतात. तसेच, या जन्मतारखेचे लोक नेहमी स्वत:ला फीट आणि तरुण ठेवण्याचा प्रयत्न करतात. थोडासा मिश्कीलही स्वभाव असतो. तसेच, या जन्मतारखेच्या लोकांची दूरदृष्टी असते. भविष्याबाबत हे लोक फार आग्रही असतात. 

पैसा कमावण्यात तरबेज :

अंकशास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोक पैसा कमावण्यात फार तरबेज असतात. त्याचबरोबर यांचा ड्रेसिंग सेन्स फार चांगला असतो. यांच्या व्यक्तिमत्त्वात किंवा स्वभावात कोणताच असा वाईट गुण नसतो. त्यामुळे या जन्मतारखेचे लोक मनानेही तितकेच श्रीमंत असतात. त्याचबरोबर, या लोकांची अनेकदा परदेशवारी असते. यांना जीवनातील सर्व सुख समृद्धीचा लाभ घेता येतो. 

समाजात मिळतो मान-सन्मान :

या जन्मतारखेच्या लोकांना समाजात मान-सन्मानही फार मिळतो. या लोकांना न्याय अतिशय प्रिय असतो. त्यामुळे न्यायाने दिलेली वागणूक यांना आवडते. यांचं ध्येय फार क्लिअर असतं. त्याचबरोबर या जन्मतारखेचे लोक व्यवसायात जोखीम घेऊन पैसा कमावतात. लीडरशीप क्वालिटी यांच्या फार असते. आपल्या व्यक्तिमत्त्वाने हे लोक इतरांना प्रभावित करतात. 

(टीप : वरील सर्व बाबी महाराष्ट्र हेडलाईन्स 24 केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून महाराष्ट्र हेडलाईन्स 24 कोणताही दावा करत नाही.)

ADS

Ad 1
Prev Article
14 जुलैला महाराष्ट्र बंदची घोषणा; बंदमध्ये सामील होण्याचे यांनी केले आवाहन : बघा काय काय राहणार बंद?
Next Article
बापरे बाप.... किंग कोब्रा शिरला बेडरूममध्ये; घरातील सर्वजण होते झोपेत: बघा व्हायरल झालेला VIDEO...