वारं पठ्या... दोन्ही हात गमावल्यानंतरही महसूल सहायकपदाला गवसणी; वैभवची ज‍िद्द आणि हिंमतीला दाद..

Share News

वारं पठ्या... दोन्ही हात गमावल्यानंतरही महसूल सहायकपदाला गवसणी; वैभवची ज‍िद्द आणि हिंमतीला दाद..

Share News

नशिबावर मात करत वैभव पईतवारने साकारले स्वप्न: जिद्द आणि चिकाटीचा प्रेरणादायी प्रवास..

महाराष्ट्र हेडलाईन्स : नियतीने १७ वर्षांपूर्वी विजेच्या धक्क्याने दोन्ही हात हिरावून घेतले, पण वैभव शिवकुमार पईतवारच्या (Vaibhav Shivkumar Paitwar) मनातली जिद्द आणि स्वप्न पाहण्याची उमेद ती हिरावू शकली नाही. मागील आठवड्यात लागलेल्या महसूल सहायक (Revenue Assistant) परीक्षेच्या निकालाने वैभवने आपल्या अदम्य इच्छाशक्तीच्या बळावर या पदाला गवसणी घातली आहे. त्याच्या या असामान्य यशामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत असून, प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय गाठता येते, याचा आदर्श त्याने समाजासमोर ठेवला आहे. वैभवचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही.

वैभव हा नांदेडच्या (Nanded) सिडको भागातील रहिवासी आहे. त्याचे शालेय शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे पूर्ण झाले आहे. पुढे ११ वी, १२ वी ते एमएसडब्ल्यू पदवीपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये पूर्ण केले. त्याने समाजशास्त्र विषातील सेट आणि नेटचीही परिक्षा उत्तीर्ण केली आहे.  

झाडावर पतंग काढायला गेला अन्... 


२००८ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे इयत्ता दहावीचे शिक्षण सुरू असताना झाडावरील पंतग काढत असताना तारेला स्पर्श झाल्याने वैभवच्या दोन्ही हाताला वीजेचा शॉक लागला. यात त्याचे दोन्ही हात गमवावे लागले. त्यावेळेस तो खचून गेला होता. या अपघातामुळे पुढे तीन वर्ष गॅप पडला. भाऊ, सोबतचे मित्र आणि शिक्षकांनी समुदपदेशन करत त्याला प्रोत्साहान दिले. त्याच्यात हिंम्मत वाढली. त्याला सर्वार्थाने सक्षम केले.'

गॅरेजमध्ये वॉचमन म्हणून केले काम.. 

 दोन्ही हात गमावले तरी, दोन्ही पायाच्या मदतीने प्रत्येक गोष्ट करण्यास शिकला. आर्थ‍िक परिस्थ‍िती नाजूक असल्याने काही दिवस गॅरेजमध्ये वॉचमन, डेटा इंन्ट्री ऑपरेटर म्हणूनही काम केले. तसेच पदवी शिक्षण घेताना नांदेड विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेतून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. 

दिपस्तंभ' ने दिला आधार... 


दरम्यान, जळगाव येथे दिव्यांगासाठीचे मोफत असलेल्या दिपस्तंभ प्रशिक्षण केंद्रात त्याने प्रवेश घेतला. २०२१,२०२२ व २०२३ असे ३ वेळेस त्याने स्पर्धा परिक्षेत यश मिळविण्यासाठी प्रयत्न केला. चौथ्याप्रयत्नात वैभवला यश आले. 

चांगले मित्र करा आणि त्यांना जपा... 
सकाळी ४, दुपारी २, सायंकाळी ३ व रात्री ३ तास नियम‍ित अभ्यास, उरलेल्या वेळात जवेण, आराम व एखाद्या विषयावर मित्रांसोबत चर्चा असा नित्यक्रम राहिला. असे म्हणतात दिव्यांगाकडून प्रेरणा मिळते. पण, मला चांगल्या मित्रांकडूनच प्रेरणा मिळाली आहे. सक्षम व्हायचे असेल तर, चांगल्या मित्रांच्या हाताला हात देवून पुढे जा. चांगले मित्र करा आणि त्यांना जपा, वैभव पईतवार याने सांगितले. 

ADS

Ad 1
Prev Article
कापूस प्रक्रिया उद्योग विकासासाठी अकोला जिल्ह्याचा केंद्र शासनाकडून...
Next Article
तुम्ही रेल्वेने प्रवास करता? मग, नव्या बदलात आता किती दिवस आधी बुकिंग करता येईल? हे जाणून घ्या...