महाराष्ट्र हेडलाईन्स : सध्या लग्नसराई नसली तरी, दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढत असल्याचे चित्र होते. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर दर गेले आहेत. दरम्यान, भारतात २४ कॅरेट सोन्याचे दर (Gold Prices in India) गेल्या आठवड्यात १,००,५५५ रुपयांवर पोहोचले होते. शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचे दर ९७७०० रुपये एक तोळा इतके होते. अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी कमजोर राहिल्यानं शनिवारी सोन्याचे दर पुन्हा वाढले आहेत. (Gold prices fell in the international market, demand for gold increased again in Asian countries including India)
रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार आंतरराष्ट्रीय बाजारात हाजिर सोन्याचे दर निचांकी पातळीवर पोहोचले होते. सलग तीन दिवस त्यामध्ये घसरण सुरु होती. सोन्याचे दर घसरल्यानं खरेदी करणाऱ्यांचा उत्साह वाढला होता. सोन्याचे दर घसरल्यानं भारतासह आशियातील दुसऱ्या बाजारांमध्ये सोन्याची मागणी वाढली होती.
७ डॉलर्स प्रति औंसची सूट देण्याचा निर्णय :
पुण्यातील एका ज्वेलर्सच्या हवाल्यानं रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं की, या आठवड्यात ग्राहकांची संख्या मागील आठवड्यापेक्षा चांगली होती. लोकांकडून सोन्याच्या दरांबाबत विचारणा सुरु होती आणि ते छोटी मोठी खेरदी करत होते. भारतीय डीलर्सनं देशांतर्गत किमीतवर ७ डॉलर्स प्रति औंसची सूट देण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये ६ टक्के आयात शुल्क, ३ टक्के विक्री शुल्क याचा समावेश आहे. गेल्या आठवड्यापर्यंत ही सूट १५ डॉलर प्रति औंस पर्यंत होती.
घसरल्यानं त्याचा फारसा परिणाम नाही :
मुंबईतील एका खासगी बँकेच्या सर्राफा व्यापाऱ्यानं म्हटलं की आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर घसरल्यानंतर ज्वेलर्स त्यांच्याकडील स्टॉक वाढवण्यासाठी उत्सुक होते. मात्र, रुपया घसरल्यानं त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
जपानमध्ये ०.६० डॉलर प्रीमियवर सोनं विकलं...
चीनमध्ये देखील डीलर्सनं सोन्याच्या आंतरराष्ट्रीय दरांवर ४.२ डॉलर्सची सूट आणि १२ डॉलर्स प्रति औंसच्या प्रिमियम रेंजमध्ये ठेवली आहे. रॉयटर्सनुसार InProved मध्ये गोल्ड ट्रेडर ह्युगो पास्कल यांनी म्हटलं की शांघाई गोल्ड एक्सचेंजवर ११ टन सोन्याचा व्यवहार झाला. यामध्ये गुंतवणूकदारांची नव्यानं वाढलेली उत्सुकता पाहायला मिळते. हाँगकाँगमध्ये देखील सोनं १.५० डॉलर प्रीमियवर विकलं जात आहे. सिंगापूरमध्ये १.४० डॉलर प्रीमियवर सोन्याचा व्यवहार झाला. तर जपानमध्ये ०.६० डॉलर प्रीमियवर सोनं विकलं गेलं.
खरेदीची मागणी मोठ्या प्रमाणात :
जपानमधील एका व्यावसायिकाच्या हवाल्यानं रॉयटर्सनं त्यांच्या रिपोर्टमध्ये म्हटलं की दरांमध्ये थोडीशी घसरण झाल्यानंतर देखील सोने खरेदीची मागणी मोठ्या प्रमाणात होती. जपान आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाल्यानंतर कमी व्याज दरांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदी केली जात आहे.