महाराष्ट्र हेडलाईन्स : Verification of Ration Card Holders : राज्यातील प्रत्येक रेशन कार्डची तपासणी होणार आहे. रेशन कार्डधारकांना त्यांच्या रेशन धान्य दुकानदारांकडून तपासणी नमुना फॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे. तो फॉर्म कार्डधारकांना पुन्हा भरून द्यावा लागणार आहे. या फॉर्मसह कार्डधारकांना हमीपत्रही द्यावे लागणार आहे. हमीपत्रासह फॉर्म दुकानदारांकडे सादर केल्यानंतर ग्राहकाला त्याची पोहोच मिळणार आहे. (Now verification of ration card holders; Will ration of 'these' card holders be stopped?)
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खूष खबर..! दोन महिन्यांचा हफ्ता 'या' दिवशी खात्यात जमा होणार...
स्थलांतरित, मृत आणि अपात्र लाभार्थी वगळण्यासाठी अपात्र रेशनकार्ड शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच चारचाकी वाहन असणारे, आयकर भरणाऱ्यांसह वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक असलेल्या रेशनकार्डधारक लाभार्थीची जिल्हा पुरवठा विभागाकडून पडताळणी केली जाणार आहे.
जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडून तयार :
राज्य सरकारकडून रेशन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची सूचना पुरवठा विभागाला प्राप्त झाली आहे. गरज नसताना मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत पात्र रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना दरमहा रेशन दुकानांतून मोफत धान्याचे वितरण करण्यात येते. त्यामध्ये आयकर भरणारे, चारचाकी वाहन असलेले, जीएसटी क्रमांक असलेले, एक लाख रुपयापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रशासनाकडून तयार करण्याचे काम सुरू आहे.
अपात्र कार्डधारकांचा धान्याचा लाभ बंद करण्यात येणार :
चारचाकी वाहन असणारे, आयकर भरणाऱ्यांसह वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना मोफत धान्याच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आयकर भरणारे, चारचाकी वाहन असलेले, वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा अधिक असलेले, जीएसटी क्रमांक असलेल्या संबंधित रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना मोफत मिळत असलेल्या धान्याचा लाभ बंद करण्यात येणार आहे.
अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीत हजारो :
अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या यादीत जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांचा समावेश आहे. यासंबंधी तक्रारी शासनाकडे होत्या. त्यानुसार तपासणी सुरू आहे. पडताळणी केल्यानंतर संबंधित रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना धान्याच्या लाभातून बाद ठरविणार असल्याची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.