महाराष्ट्र हेडलाईन्स : Anand Bondharkar Nanded : लोहा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडगाव येथे आमदार आनंदराव बोंढारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अशोक मोरे सोनखेडकर यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. (On the occasion of MLA Anandrao Bondharkar's birthday, Z.P. Prof. School Daggaon distributed school supplies)
या कार्यक्रमात आमदार बोंढारकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून अक्षरगंगा परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या वेळी सातवीच्या विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या हस्तलिखिताचे अनावरणही आमदार बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या हस्तलिखिताचे कौतुक उपस्थितांनी केले.
कार्यक्रमाच्या भाषणात, कुमारी सोनाली या विद्यार्थिनीने आमदार बोंढारकर यांना वाढदिवसाच्या आपल्या विशेष भाषणातून शुभेच्छा दिल्या. तर कुमारी शुभांगीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर एक प्रभावी भाषण दिले. या दोन्ही विद्यार्थिनींच्या भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कैलासे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लक्ष्मीकांत तेलंग यांनी केले तर आभार प्रदर्शन हिराचंद्र कदम यांनी केले. सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. आमदार बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.