शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांचे मोठे विधान..!; वाचा सविस्तर..

Share News

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांचे मोठे विधान..!; वाचा सविस्तर..

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : मागील वर्षी अतिवृष्टीमुळे आता तोंडाशी आलेला घास फिरवला गेला आहे. त्यातच रब्बी हंगामातही अवकाळी पावसाने उरलेल्या पिकाचेही प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे सर्व गणित बिघडले आहे. अशावेळी शासनाकडून मदत मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या (Karjmafi) प्रतीक्षेत होते. राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे चित्र आहे. कारण यंदाच्या पावसाळी अधिवेशनात केवळ चर्चे व्यतिरिक्त काहीच न झाल्याने शेतकऱ्यांच्य पदरी निराशाच पडली आहे. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट वक्तव्य केले आहे. 

सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये हेवेदावे :

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Pavsali Adhiveshan) राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. जवळपास वीस चाललेल्या या अधिवेशनात केवळ सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये हेवेदावे झाल्याचे पाहण्यात आले. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा विषय दूरच राहिला. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत कर्जमाफीविषयी थोडक्यात मत व्यक्त केले.

दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील :

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra fadnavis) म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच, पण कर्जमाफी हा तत्कालिक उपाय आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतक-यांचे जीवन सुखाचे व्हावे, त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील, त्याच्याच शिफारशी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान,  पुढील अधिवेशन दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

ADS

Ad 1
Prev Article
Maharashtra Rain : हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज: आता 'या' तारखांना पडणार विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस...
Next Article
समुद्रसपाटीपासून 3200 मीटर उंचीवर एक गाव तरीही तेथे पाऊसच पडत नाही, मग जिवंत कसे राहतात लोक?