महाराष्ट्र हेडलाईन्स : पावसा अतिशय महत्त्वाचा आहे. पाऊस नसेल तर सजीव सृष्टी जिवंत राहणे ही अवघड आहे. पिण्यासाठी पाणी, पिकाला पाणी, पाण्याशिवाय कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही. पाणी हे अनमोल आहे. निसर्गाचे देण आहे. त्यामुळे दरवर्षी या हंगामात पावसाची चातकासारखी सर्वजण वाट पाहून असतात.
यमनमधील अल हुतैब (Al Hutaib in Yemen) हे एक अद्वितीय गाव आहे जिथे कधीही पाऊस पडत नाही. तरीही, डोंगराळ भूभागातील हे गाव समुद्रसपाटीपासून 3200 मीटर उंचीवर असून, पावसाचे ढग गावाच्या खाली पाऊस सोडतात आणि हे पाणी वाहिण्याद्वारे गावात आणले जाते. प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा संगम असलेले हे गाव पर्यटकांना आकर्षित करते.
गावातील लोक जिवंत कसे राहतात? :
उन्हाळ्यानंतर लगेच पावसाळा येतो. पावसाळ्यात नदीनाले भरून जातात. प्यायला पाणी मिळतं. शेतात पिकं तरारून जातात. वातावरण प्रफुल्लित होतं. असंख्य लोक पावसाचा आनंद घेण्यासाठी कामावर दांड्या मारतात आणि पिकनिक करतात. पण जगात असं एक गाव आहे, जिथे कधी पाऊसच पडत नाही. तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरं आहे. मग या गावातील लोक जिवंत कसे राहतात? असा प्रश्न पडतो.
... तरीही गाव सुंदर :
आपण ज्या गावाची चर्चा करत आहोत, त्याचं नाव आहे, अल हुतैब (Al Hutaib in Yemen) यमन या देशातील हे महत्त्वाचं गाव आहे. अल हुतैब हे जगातील असं एकमेव गाव आहे, जिथे पाऊसच पडत नाही. पण तरीही अल हुतैब हे गाव अत्यंत सुंदर आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक भेट द्यायला येतात.
डोंगराच्या कुशीत बसलेले गाव :
डोंगराच्या कुशीत बसलेल्या या गावाकडे पर्यटकांचे पाय वळले नसते तर नवलच. अगदी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही या गावाला भेट देण्यासाठी लोक येतात. अल हुतैब गाव समुद्र सपाटीपासून 3200 मीटर उंचावर आहे. या ठिकाणचं वातावरण नेहमी गरम राहतं. त्यामुळे या ठिकाणच्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक नेहमी येतात. हिवााळ्यात सकाळी या गावातील वातावरण थंड असतं. सूर्योदय झाल्यावर मात्र वातावरण गरम व्हायला सुरुवात होते.या गावात पाऊस पडत नाही. कारण हे गाव अगदी ढगांच्या जवळ वसलेलं आहे. त्यामुळे पावसाचे ढग गावाच्या खाली तयार होतात आणि गावाच्या खालीच पाऊस कोसळतो. त्यामुळे हे पाणी वर गावात नेलं जातं. त्यामुळे गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे.या गावात प्राचीन आणि आधुनिक वास्तुकलेचा संगम पाहायला मिळतो. तुम्हाला जर संधी मिळाली तर नक्कीच या आगळ्यावेगळ्या गावाला भेट द्या आणि या आगळ्या वेगळ्या गावातील पावसाचा आनंद घ्या.