३०० फूट खोल दरी...अतिवेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या टोकावर मधोमध अडकला तरूण...! ; पुढे वाचा आणि व्हायरल व्हिडीओ बघा...

Share News

३०० फूट खोल दरी...अतिवेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या टोकावर मधोमध अडकला तरूण...! ; पुढे वाचा आणि व्हायरल व्हिडीओ बघा...

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : पावसाळ्याचा दीड महिना उलटला आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत. तर मराठवाड्यात मात्र, अजून प्रतिक्षाच आहे. ज्या भागात मुसळधार पाऊस झाला त्या ठिकाणी आता धबधबे प्रवाहीत (Waterfalls flowing) झाले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. 


व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या क्लिक करा :

https://www.instagram.com/reel/DMAIYkcM98F/?utm_source=ig_embed&ig_rid=9f8ea93f-4622-4208-bcd4-b5e4aa335247


धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद ... 

पावसाळ्यात अनेकांना ट्रेकिंग वर जातात. धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात. काही पर्यटक तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात. पण, असे साहस काही वेळा पर्यटकांच्या चांगलेच जीवावर बेतते. अशा घटना पाहता वारंवार सांगितले जाते की, पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता, धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात. अशाच पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ (Video) व्हायरल होतोय. 

धबधब्यावर जाताना शंभर वेळा करा विचार :

ज्यामध्ये तो काळूवॉटरफॉलला फिरण्यासाठी गेला होता मात्र नसतं धाडस त्याच्या जीवावर बेतलं आहे. धबधब्याचं पाणी अचानक वाढलं अन् काळू वॉटरफॉलवर तरुण मधोमध अडकला त्यानंतर काय घडलं तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून धबधब्यावर जाताना शंभर वेळा विचार कराल. 


व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या क्लिक करा :

https://www.instagram.com/reel/DMAIYkcM98F/?utm_source=ig_embed&ig_rid=9f8ea93f-4622-4208-bcd4-b5e4aa335247


३०० फूट खोल दरी अन् तरूण पाण्याच्या टोकावर अडकला... 

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथील प्रसिद्ध काळू धबधब्याच्या टॉप पॉईंटवर ही घटना घडली. प्रसिद्ध काळू धबधबा हा पाच टप्यात खोल दरीत कोसळत असतो. त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी म्हणजेच टॉप पॉईंटवर एक पर्यटक हा पाय घसरून पडला होता. खाली २०० ते ३०० फूट खोल दरी आणि हा तरुण काळू नदीच्या अतिवेगवान वाहणाऱ्या पाण्याच्या टोकावर अडकला होता. मृत्यूच्या दारातच अडकलेला हा तरुण कधीही पाण्याबरोबर खाली वाहून जाऊ शकत होता. मात्र काही तरुणांनी थरारक रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला वाचवलं आहे. याचा व्हिडीओही व्हायर होत असून व्हिडीओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल.

तरुणांनी त्याच्या कानशिलात लगावली :

पर्यटनस्थळावर रिल्ससाठी स्टंटबाजी करण्याच्या नादात कार ३०० फूट दरीत कोसळण्याची घटन साताऱ्यात घडली होती. आता पुन्हा एकदा पुण्यातील जुन्नर येथील काळू धबधब्यावर एका विचित्र घटना घडली आहे. जवळपास २०० ते ३०० फूट खोल धबधब्याच्या टोकावर एक तरुण अडकला होता. सुदैवाने या तरुणाचाल वाचवण्यात आलं. पण, त्याच्या या कृत्यामुळे वाचवल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याच्या कानशिलात लगावून परत असं न करण्याची ताकीद दिली.

ADS

Ad 1
Prev Article
मुख्याध्यापकाचे शाळेच्या खोलीतच मद्यपान ! ; पालकांनी पकडले रंगेहाथ... पालक संतप्त
Next Article
दोनवाडा येथील सरपंच (शेतकरी) श्रीकृष्ण झटाले यांचा 'देशी जुगाड': मजुरांच्या अभावावर मात करणारा अभिनव प्रयोग!