रेशन कार्डची e-KYC घरी बसून करता येणार...! सोपी पद्धत जाणून घ्या

Share News

रेशन कार्डची e-KYC घरी बसून करता येणार...! सोपी पद्धत जाणून घ्या

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत केंद्र सरकार गरीब गरजू लोकांना अत्यंत कमी दरात रेशन पुरवते. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य गट कार्डधारकांना मोफत धान्याचे वितरण करण्यात येते. मात्र, स्वस्त धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना उजेडात येतात. त्यामुळे शासनाने रेशनच्या धान्याचे वाटप ई-पीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल) पद्धतीने करण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत शिधापत्रिकांमध्ये समाविष्ट नावांचे आधार व्हेरिफिकेशन व ई-केवायसी (Ration Card e-KYC) केल्यानंतरच ई-पीओएस मशीनद्वारे धान्याचा लाभ मिळतो. याचा उपयोग रेशनच्या काळ्याबाजाराला आळा बसण्यासाठी होतो. 

घरी बसूनही e-KYC प्रक्रिया... 

नियमानुसार दर पाच वर्षांनी रेशनकार्डची e-KYC करून घेणे आवश्यक झाले आहे. अनेकांनी शेवटची e-KYC 2013 मध्ये केली होती, याचा अर्थ ते पुन्हा अपडेट करणे आवश्यक झाले आहे परंतु तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी आहे की आता तुम्ही घरी बसूनही e-KYC प्रक्रिया पूर्ण करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसे.

रेशन कार्डची e-KYC कशी करावी?

  • हे काम करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या डिव्हाइसवर 'Mera KYC' अ‍ॅप आणि 'Aadhaar FaceRD' अ‍ॅप इन्स्टॉल करा.
  • यानंतर अ‍ॅप ओपन करा आणि तुमचे लोकेशन टाका.
  • आता तुम्हाला तुमचा आधार नंबर, कॅप्चा कोड आणि OTP भरावा लागेल जो तुमच्या मोबाईलवर येईल.
  • आता तुम्हाला तुमचे आधार डिटेल्स स्क्रीनवर दिसतील.
  • इथून आता तुम्ही 'Face e-KYC'चा पर्याय निवडा.
  • असे केल्यावर कॅमेरा आपोआप ऑन होईल.
  • आता इथे तुमच्या फोटोवर क्लिक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
  • आता तुमची e-KYC पूर्ण होईल.

e-KYC कसे तपासावे?

  1. यासाठी तुम्हाला तुमचे 'Mera KYC' अ‍ॅपही उघडावे लागेल.
  2. इथून आता तुम्हाला तुमचं लोकेशन टाकावं लागेल.
  3. यानंतर आधार नंबर, कॅप्चा आणि ओटीपी टाका.
  4. डिटेल्स उघडल्यानंतर, e-KYC आधीच झाले आहे, त्यानंतर Status: Y स्क्रीनवर दिसेल.
  5. त्याचबरोबर e-KYC न केल्यास Status: N दिसेल.

रेशन कार्डची ऑफलाइन e-KYC कशी करावी?

रेशनकार्डचे मोबाइलवरून ऑनलाइन e-KYC करण्यात अडचणी येत असतील तर टेन्शन घेण्याची गरज नाही. आपण आपल्या जवळच्या रेशन दुकानात किंवा CSC केंद्रात जाऊन देखील हे e-KYC पूर्ण करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची कागदपत्रे सोबत घेऊन जावे लागते. ऑफलाइन e-KYC साठी आधार कार्ड आणि रेशन कार्ड सोबत बाळगणे आवश्यक आहे.

यानंतर दुकानातील पीओएस मशिनद्वारे तुमची बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन घेतली जाईल आणि आधार नंबरही व्हेरिफिकेशन केला जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड e-KYC असेल.

मुदत वाढची शक्यता कमी :

दरम्यान, ई-केवायसी करणे गरजेचे असून, २३ टक्के लाभार्थी राहिले आहेत. अन्न नागरि पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी ई-केवायसी नसणा-यांचे सप्टेंबरपासून रेशन बंद करण्याचा निणर्य घेतला आहे. त्यामुळे ३१ जुलै पर्यंत ज्यांची ई-केवायसी राहिली आहे त्यांनी पूर्ण करावी. पुन्हा मुदत वाढ मिळण्याची शक्यता कमी आहे, असे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी जगद‍िश बरदेवाड यांनी सांगितले.

ADS

Ad 1
Prev Article
Next Article
अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या नुकसान भरपाईतून बळीराजाला मिळणार दिलासा..! ; ३३७ कोटी ४१ लाख अनुदानास वितरणास मंजुरी