Education Minister Dada Bhuse : शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार

Share News

Education Minister Dada Bhuse : शाळेत राष्ट्रगीतानंतर आता 'गर्जा महाराष्ट्र माझा' राज्यगीत गाणे बंधनकारक, अन्यथा कारवाई होणार

Share News

महाराष्ट्र हेडलाईन : Education Minister Dada Bhuse : मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आलं आहे. 'गर्जा महाराष्ट्र माझा' (Garja Maharashtra Maja) हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असेल. जी शाळा याची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे (State Education Minister Dada Bhuse) यांनी दिला आहे.

हे पण वाचा : 'या' शाळांना राहणार तब्बल दीड महिना सुट्टी; प्रशासनाने घेतला निर्णय; बघा यामध्ये तुमची शाळा आहे का..?


मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे, असा आदेश देण्यात आला आहे. 

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार :

पूर्वी इयत्ता चौथी आणि सातव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा होत होती. त्यानंतर पाचव्या आणि आठव्या वर्गाची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. मात्र, आता यानंतर इयत्ता चौथी, पाचवी, सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेऊन शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याचा संकल्प दादा भुसे यांनी व्यक्त केला.

आरोग्याची काळजी शिक्षण विभाग घेणार :

उच्च दर्जाच्या शिक्षणासोबतच आता विद्यार्थ्यांच्याही आरोग्याची काळजी शालेय शिक्षण विभाग घेणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांची जी काही तपासणी व्हायची ती औपचारिकरित्या व्हायची. मात्र, आता पालकांच्या उपस्थितीत आरोग्य पथक विद्यार्थ्यांची तपासणी करणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना एक हेल्थ कार्ड देणार आहे. हे हेल्थ कार्ड त्यांना आयुष्यात अनेक ठिकाणी उपयुक्त पडणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली.

भंडारा येथे अधिकाऱ्यांना दिले निर्देश :

भंडारा येथे शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना काही निर्देश दिलेत.

ADS

Ad 1
Prev Article
आरे बापरे...आयब्रो थ्रेडिंग केलं आणि लिव्हर फेल झालं..!; डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती
Next Article
Mangal Prabhat Lodha: विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी, पुढील महिन्यापासून 20 नवीन अभ्यासक्रम सुरू होणार ...