मोफत धान्य देण्याच्या नावाखाली हजारोंना घातला गंडा; दोन वर्षानंतर आरोपींना अटकेत; नाव बदलून करत होते वास्तव्य....!

Share News

मोफत धान्य देण्याच्या नावाखाली हजारोंना घातला गंडा; दोन वर्षानंतर आरोपींना अटकेत; नाव बदलून करत होते वास्तव्य....!

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : शासनाची अन्न धान्य वाटपाची योजना असल्याचा बनाव करून हजारो गोरगरिबांना गंडा घालणाऱ्या नांदेडच्या पती पत्नीला अखेर पोलिसांनी अटक केली. बाबासाहेब सुतारे (वय ३९ रा. औंढा नागनाथ जि हिंगोली) आणि सोनाली बाजड (वय २९ रा. औंढा नागनाथ जि. हिंगोली) असे आरोपी दांम्पत्याच नाव आहे. गुन्हा दाखल झाल्या नंतर हे आरोपी दोन वर्षापासून फरार होते. दोन वर्ष ते नाव बदलून लातूर येथे राहत होते. या आरोपी दांम्पत्याने कमी पैश्यात तीन महिने मोफत धान्य तसेच इतर वस्तू देण्याचा बनाव करून हजारो नागरिकांना गंडा घातला होता. (Thousands were duped in the name of providing free food grains; Accused arrested after two years; They were living under changed names....!)

मुख्य आरोपी असलेला बाबासाहेब सुतारे याने छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्था धार संचालित महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्र सुरु केले होते. 

शासनामान्य योजना असल्याचा केला बनाव :

संस्थेमार्फत शासनामान्य योजना असल्याचा बनाव केला. ११११ रुपयांच्या मोबदल्यात ३० किलो गहू, २५ किलो तांदूळ, १० किलो साखर, १० किलो पोहा, १२०० रुपयात ६० किलो गहू, २५ किलो तांदूळ, २२०० रुपयात शिलाई मशीन, १२०० रुपये भरल्यानंतर विधवा महिलांना एक वर्ष प्रति महिना १० हजार रुपये, ३० हजार रुपयात इलेक्ट्रिक स्कुटी असे अमिष आरोपीकडून दाखवण्यात आले. 

कंपनीचे एजंट नेमून गरिबांना ओढले जाळ्यात :

नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात या ठगानी दुकाने थाटली होती. कंपनीचे एजंट नेमून गरिबांना जाळ्यात ओढले गेले. शासनाची योजना असल्याचा समज झाल्याने हजारोच्या संख्येने गोरगरीबानी पैसे देखील दिले. पैसे दिल्यानंतर तीन महिन्यांनी लाभ मिळणार असे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात मोबदला देण्याची वेळ आली तेव्हा मुख्य आरोपी बाबासाहेब सुतारे आणि त्याचे सहकारी गायब झाले.

प्रत्यक्षात चौदा हजार लोकांची फसवणूक :

या सर्व फसवणूकीचा सूत्रधार आहे बाबासाहेब सुतारे होता. गुन्हा दाखल झाल्यावर दोन वर्षांपासून सुतारे त्याची पत्नी सोनालीला घेऊन फरार. पैसे देऊन तीन महिने उलटूनही अन्न धान्य मिळत नसल्याने तक्रारी वाढल्या. हजारो लोकांच्या तक्रारी येऊ लागल्या. गोरगरिबांची फसवणूक झाल्याने काही संघटनानी मोर्चेही काढले. अखेर या प्रकरणी जून २०२३ मध्ये वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जवळपास १ कोटी ८५ लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली. प्रत्यक्षात चौदा हजार लोकांची फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

लातूरमध्ये करत होते वास्तव्य :

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पति पत्नी फरार झाले. गोरगरिबांना ठगनाऱ्या बाबासाहेब सुतारे आणि त्याची पत्नी सोनाली नाव बदलून लातूरमध्ये राहत होते. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सोनकांबळे यांच्या पथकाने लातूर येथे जाऊन दोघांना अटक केली. दरम्यान त्यांची मलमत्ता आणि बँक अकाउंट सील करून पैसे वसुलीचा प्रयत्न केला जात यांनी सांगितले.

ADS

Ad 1
Prev Article
शिंदे गटाच्या या मंत्र्याला आली आयकर खात्याची नोटीस...; मालमत्तेची झाडाझडती होणार?
Next Article
कँटिनमधील कर्मचाऱ्याच्या मारहाणी नंतर काय म्हणाले शिवसेना शिंदे गटाचे आमदार? वाचा...