महाराष्ट्र शासनाच्या 'या' विभागात मेगा भरतीची सुवर्णसंधी !

Share News

महाराष्ट्र शासनाच्या 'या' विभागात मेगा भरतीची सुवर्णसंधी !

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : तुम्ही महाराष्ट्रातच शासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहत असाल तर, तुमच्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे! महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाने कनिष्ठ आरेखक (गट-क) आणि अनुरेखक (गट-क) या पदांसाठी एकूण १५४ रिक्त जागांची मेगा भरती जाहीर केली आहे. ही संधी तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकते. (The Town Planning and Valuation Department of the Government of Maharashtra has announced a mega recruitment for a total of 154 vacancies for the posts of Junior Draftsman (Group-C) and Draftsman (Group-A)

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादाः 

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी १०वी उत्तीर्ण असण्यासोबतच दोन वर्षांचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक अभ्यासक्रम उत्तीर्ण प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे:

  • १) खुला प्रवर्गः १८ ते ३८ वर्षांपर्यंत.
  • २) अराखीव (खुला) प्रवर्गः १८ ते ४३ वर्षांपर्यंत.

आकर्षक वेतनस्तरः निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतनस्तर मिळेलः

  • १) कनिष्ठ आरेखक (गट-क): वेतनस्तर एस ०८, रु.२५५००-८११०० अधिक नियमानुसार देय भत्ते.
  • २) अनुरेखक (गट-क): वेतनस्तर एस ०७, रु.२१७००-६९१०० अधिक नियमानुसार देय भत्ते.

अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखाः

  • १) अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीखः १९ जून, २०२५ रोजी दुपारी १७.०० वाजल्यापासून.
  • २) ऑनलाइन अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक: २० जुलै, २०२५ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक: २१ जुलै, २०२५ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत.

परीक्षा शुल्कः

  • १) अराखीव (खुला) प्रवर्गः रु.१०००/-
  • २) राखीव प्रवर्गः रु.९००/-
  • ३) माजी सैनिकांसाठी कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.

या संधीचा लाभ घेऊन आपले भविष्य घडवा ! अधिक तपशिलांसाठी विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

महत्वाचे : उमेदवारांनी अिधकृत जािहरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

ADS

Ad 1
Prev Article
Next Article