शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय : अखेर हा कायदा केला रद्द ; बळ‍ीराजाला मिळणार दिलासा...

Share News

शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय : अखेर हा कायदा केला रद्द ; बळ‍ीराजाला मिळणार दिलासा...

Share News

महाराष्ट्र हेडलाईन्स : पावसाळी अधिवेशन सुरू आहे, याचदरम्यान सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. तुकडा बंदी कयदा रद्द करण्यात आला आहे. या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत घोषणा केली. आम्ही या कायद्यासंदर्भातील सर्व बंधणं मुक्त करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान हा कायदा रद्द झाल्यामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. (The piecemeal ban has been repealed. In this regard, Revenue Minister Chandrashekhar Bawankule announced in the Legislative Assembly.)

गेल्या अनेक दिवसांपासून हा कायदा रद्द करण्यात यावा, अशी मागणी सुरू होती. अखेर हा कायदा आता सरकारने रद्द केला आहे. विधानसभेत या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे. या संदर्भात घोषणा करताना लवकरच आम्ही एक एसओपी या संदर्भात जारी करू, ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं काम अधिक सोप होईल, त्यांना सरकार दरबारी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटले आहे. यामुळे आता लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

नेमकं काय म्हणाले बावनकुळे? 

तुकडे बंदी कायदा आम्ही रद्द करत आहोत, लवकरच आम्ही त्या संदर्भातील नोटिफिकेश आम्ही काढणार आहोत, लवकरच या कायद्यामध्ये आम्ही बदल करणार आहोत. आम्ही या कायद्यासंदर्भातील सर्व बंधण मुक्त करत आहोत, लवकरच आम्ही एक एसओपी या संदर्भात जारी करू, ज्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचं काम अधिक सोप होईल, त्यांना सरकार दरबारी हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

काय आहे तुकडा बंदी कायदा?

तुकडा बंदी कायद्यानुसार प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जमीन खरेदी किंवा विक्री करण्यात प्रतिबंध होता, एक, दोन, तीन अशी गुंठ्यामध्ये जमीन खरेदी किंवा विक्री करता येत नव्हती, मात्र आता हे निर्बंध हटवले जाणार आहेत.

ADS

Ad 1
Prev Article
Next Article
नांदेडला लवकरच 'एमआरआय' व 'सिटीस्कॅन' मशीन! ; वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची ग्वाही